कसाल
गावाचा इतिहास
कसाल हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कसाल हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे २० किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १२ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १८ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ४३९९ इतकी आहे. गावातील लोक होळी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये ६ अंगणवाडी ४ प्राथमिक शाळा ,१ माध्यमिक शाळा आणि १ उच्च माध्यमिक शाळा आहे तसेच सुसज्ज वाचनालय, पोलीस चौकी, व्यायाम शाळा आहे गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये कार्यकारिणी सदस्य १०, ग्रामसेवक व ७ कर्मचारी आहेत.

भौगोलिक परिस्थिती
कसाल गावाला भौगोलिक सौंदर्याचा वारसा मिळालेला आहे. गावातील वृक्षवल्लीं गावची शोभा वाढवतात. गावाच्या सीमेला रानबांबूळी, पडवे, कुंदे व ओवळीये ही गावे आहेत. गावातुन कसाल नदी वाहते. नदिकडील जमिनीचा बागायती शेतीसाठी विकास झपाट्याने होत आहे. येथील हवामान उष्ण व दमट प्रकारचे आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात भाताचे पिक घेतले जाते.
ग्रामपंचायतीबद्दल व इतर माहिती

कसाल हे महाराष्ट्रातील सिंधदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील एक उपक्रमशील, कृषीसंपन्न व सामाजिकदृष्ट्या सजग गाव आहे. कसाल हे गाव तालुका मुख्यालय कुडाळ (तहसिलदार कार्यालय) पासून सुमारे २० किमी आणि जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्गपासून सुमारे १२ किमी अंतरावर स्थित आहे. या गावामध्ये १८ वाड्या आहेत. गावची लोकसंख्या ४३९९ इतकी आहे. गावातील लोक होळी, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी यासारखे उत्सव एकोप्याने साजरे करतात. गावामध्ये ६ अंगणवाडी ४ प्राथमिक शाळा ,१ माध्यमिक शाळा आणि १ उच्च माध्यमिक शाळा आहे तसेच सुसज्ज वाचनालय, पोलीस चौकी, व्यायाम शाळा आहे गावात एक सुसज्ज असे ग्रामसचिवालय आहे त्यामध्ये कार्यकारिणी सदस्य १०, ग्रामसेवक व ७ कर्मचारी आहेत.
प्राथमिक माहिती
ग्रामपंचायत स्थापना दिनांक : 06-10-1956
एकूण लोकसंख्या : 4399
एकूण कुटुंबे : 1049
पुरुष : 2192
महिला : 2207
मतदारांची संख्या -4399
पुरुष - 2192- स्त्री - 2207
एकूण क्षेत्रफळ - 1439.32 hectares
लागवडी योग्य क्षेत्र - 176.99 hectares
वन क्षेत्र - 37.17 hectares
बागायत क्षेत्र – 25.20 hectares
अंगणवाडी- 6
जिल्हा परिषद शाळा - 4
सार्वजनिक मंदिर- 9
सार्वजनिक विहीर - 36